
शिवसेना प्रणित रेल कामगार सेनेत एनआरएमयू आणि सीआरएमएस युनियनच्या कार्यकर्त्यांनी धडाक्यात प्रवेश केला आहे. येणाऱया निवडणूकांत रेल कामगार सेना मान्यताप्राप्त युनियन करण्याची शपथ यावेळी कामगारांनी घेतली.
रेल कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली व रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर उर्फ बाबी देव, कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेमधील एनआरएमयू व सीआरएमएस या संघटनेत काम करणाऱया शेकडो कामगारांनी शिवसेना प्रणित रेल कामगार सेनेत प्रवेश केला आहे. भगवा झेंडा हातात धरीत एकनिष्ठपणे रेल कामगार सेना वाढविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचे व येणाऱया निवडणुकांमध्ये रेल कामगार सेना मान्यताप्राप्त करण्यासाठी झटण्याची शपथ घेतली आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता रेल कामगार सेनेचे सहकार्याध्यक्ष डॉ.जनार्दन देशपांडे, कृष्णा रणशूर, हिरेन अंजारा यांनी अथक परिश्रम घेतले. रेल कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी कल्याण-इगतपूरी विभागासाठी संपर्पप्रमुख सुशिल रोकडे यांची आणि कल्याण-लोणावळासाठी दिनेश हलाले यांची संपर्पप्रमुख म्हणून नेमणूक केली. याप्रसंगी रेल कामगार सेनेचे उत्तम हरमळकर, सुरेश परदेशी, स्वप्नील झेमसे, बी.बी.शर्मा, राजा पुट्टी तसेच महिला आघाडीच्या सरचिटणीस सोनाक्षी मोरे, भारती देशपांडे, संगिता सोनावणे, मंजुषा माटे, नीता भानुशाली आदी उपस्थित होते.




























































