
फ्लॅटमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करून भिगवण पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. तर महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिनीनाथ रमेश गायकवाड (वय 28, रा. मदनवाडी इंदापूर) आणि रोहिदास गंगाराम दराडे (वय 29 रा.अकोले इंदापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
भिगवण शहरामध्ये रहिवासी परिसरात अवैधपणे कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाच्या मदतीने संबंधित फ्लॅटमध्ये छापा टाकून दोन महिलांची सुटका केली.
महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस हवालदार वीर, महिला पोलीस नाईक जाधव,पोलीस नाईक पठाण यांच्या पथकाने केली आहे.























































