
सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी दापोलीत आजपासूनच पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे समुद्र किनार्यावरील बहुतेक रिसॉर्ट हाऊस फुल्ल झाली आहेत.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर जवळपास 7 महीने बंद पडलेला पर्यटन व्यवसाय हा नोव्हेंबर महिण्यापासुन सुरू झाला असला तरी खर्या अर्थाने 2020 अखेर सरत्या वर्षाच्या उत्तरार्धात आज ख्रिसमस सणापासुनच येथील समुद्र किनार्यावरील रिसॉर्टमध्ये मोठयाप्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने कोलंमडलेला व्यवसाय पुन्हा गतीने सुरू झाला आहे. त्यामुळे आपल्या पर्यटन व्यवसायाला आता पुन्हा नवसंजीवनी मिळण्याची पर्यटन व्यवसायिकांना आशा निर्माण झाल्याने पर्यटकांच्या दापोलीतील येण्याने दापोलीतील पर्यटन व्यावसायिक चांगलेच सुखावले आहेत.
गेल्या मार्च महिन्यापासून दापोलीतील समुद्र किनारपट्टील पर्यटन व्यवसाय हा पुर्णपणे कोलमडलेला होता. त्यामुळे पर्यटन व्यावसाकि तर आर्थिक अडचणीत आले होते. तसेच या पर्यटन व्यवसायावर आधारीत फळ फळावळ, भाजीपाला, दुध दुभते, चिकण मटण, शित पेये, कोकणमेवे, बैलगाडी, घोडा गाडी आदी प्रकारच्या पर्यटनावर आधारीत अवलंबून असलेले विविध प्रकारचे व्यावसायिकही पुर्णपणे आर्थिक अडचणीत आले होते.
मात्र 5 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र शासनाने काही अटी शर्तीना अधीन राहून पर्यटन व्यवसायाला संमती दिल्याने गेले सात आठ महीने बंद पडलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरू झाला.
इतके दिवस घरीच अडकून पडलेले अनेजन निवांतपणासाठी कोकणातील दापोलीच्या स्वच्छ सुंदर समुद्रकिनार्याकडे वळू लागले. त्यातच आता ख्रिसमस सणाची 25 डिसेंबरची आणि शनिवार रविवारची जोडून आलेली सुट्टी आणि पुढे येणार्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी खास दापोलीच्या समुद्र किनार्याची निवड पर्यटकांनी केल्याने दापोलीतील समुद्र किनारपट्टीतील केळशीपासून पाडले, आजर्ले, हर्णे, पाळंदे, मुरूड, कर्दे,लाडघर, कोळथरे, दाभोळ आदी भागातील जवळपास सर्वच रिसॉर्ट हाऊस फुल्ल झाली आहेत.
त्यामुळे यापुढे आंगतुक येणार्या पर्यटकांना राहण्यासाठी मनाजोगे रिसॉर्ट तर मिळणार नाहीच शिवाय निवासाची सोय होणेही मुश्कील होईल. असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे आजपासूनच पर्यटकांच्या दापोलीतील येण्याने येथील पर्यटक व्यवसायिक मात्र चांगलेच सुखावले आहेत.




























































