
ओंकार मधुकर भोवर
आपल्या छंदाचे व्यवसायात रूपांतर करूनही व्यवसायात मोठे यश मिळवता येते हे बुलेट वर्ल्डचे संस्थापक ओंकार मधुकर भोवर यांनी दाखवून दिले. परळ येथे त्यांचे बुलेटचे सर्व्हिस सेंटर आहे. त्यांच्या उत्तेजनीय कामगिरीबद्दल मुंबईच्या महापौर व प्रथम नागरिक किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते अर्थसंकेत महाराष्ट्र उन्नतीकड़े प्रस्तुत BEST START-UP OF THE YEAR-2020 (MALE) हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
मराठी माणूस व्यवसायात कात टाकतोय. सध्या तरुण आणि युवा उद्योजक आपल्या नवनवीन संकल्पना घेऊन बाजारात उतरून यशस्वी होताना दिसतात. ओंकार यांनाही सुरुवातीपासूनच व्यवसायांची प्रचंड आवड. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर नोकरीला सुरुवात केली. नोकरीत काही मन रमेना. व्यवसायाची आवड असल्याने एका व्यवसायाला सुरुवात केली, परंतु कोणताही अनुभव न घेता मोठी उडी मारल्यानं व्यवसाय बंद करायची वेळ आली.
घरच्यांच्या मनाविरुद्ध व्यवसाय व पहिल्याच व्यवसायात मोठ नुकसान झालेल्या ओंकार यांनी खचून न जाता पुन्हा नव्याने सुरुवात करायचे ठरवले. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, वो अपने बस की बात नही, आपली नोकरीच बरी, तुला मुलगी कोण देणार वैगेरे वैगेरे वाक्यांना छेद देऊन त्यांनी पुन्हा भरारी घ्यायचं ठरवलं. नव्याने सुरुवात कशी करायची हेच कळत नव्हतं. मराठी तरुणांना व्यवसाय तर करायचा आहे, पण कोणता व्यवसाय करू हाच मोठा प्रश्न असतो. त्यांना बुलेटची आवड असल्याने त्यांनी आपल्या छंदालाच व्यवसायात परावर्तित करायचं ठरवलं. सुरुवातीचा काळ हा प्रत्येक उद्योजकाच्या आयुष्यातला खडतर काळ असतो व सुरुवातीचे 999 दिवस जो व्यवसायात पूर्ण करतो तो पुढे निघून जातो असं म्हणतात. बुलेट हे त्यांचं पॅशनच असल्याने त्यांनी दर्जेदार सेवा, व्यावसायिक प्रामाणिकपणा, मार्केटिंग, नेटवार्ंकग व नवनवीन संकल्पना राबवत अल्पावधीतचं बुलेट वर्ल्ड सर्वत्र पोहचवलं. गुगल व जस्ट-डायलचे 2018-19-20 वर्षांचे बेस्ट बुलेट सर्व्हिस सेंटर हे बुलेट वर्ल्डला मिळालेले आहे. त्यांच्या मतदान करा व बुलेटची सर्व्हिस मोफत मिळवा या संकल्पनेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रातल्या प्रसार माध्यमांनीही त्यांच्या या कामगिरीची दखल घेतली होती. त्यांनी लडाखमध्ये केलेल्या स्वच्छ भारत अभियानाची दखल लेह-लडाखमध्येही घेतली गेली होती. तसेच संपूर्ण देशांतील Best 500 Brand In India -2020 मध्ये त्यांच्या बुलेट वर्ल्डचे नॉमिनेशन झालेले आहे. India Star Passion Award – 2019 व OMG Books Of Record -2020 त्यांना सन्मानित केलेलं आहे. समाजात व्यवसाय करत असताना आपणही समाजाचे देणे लागतो व जिद्द, ध्येयनिश्चिती, चिकाटी, ग्राहकांच्या अपाॊक्षा पूर्ण केल्या तर मराठी माणूसही कोणत्याही व्यवसायात यशस्वी होऊ शकतो.
डॉ. अक्षय भोईर
डॉ. अक्षय भोईर हे स्वतः आयुर्वेद आणि योग या विषयात MD असून गेली 12 वर्षे ब्रह्मांड आयुर्वेद या नावाने आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. जीवनशैलीचे आजार (lifestyle disorder) यामध्ये यांचे विशेष नैपुण्य असून त्यांनी मायग्रेन (migraine) या प्रकारातील डोकेदुखीवर रीसर्च केलेला आहे, ज्यामध्ये गाईच्या तुपाने आणि दुधाने विशेष लाभ मिळतो हे सिद्ध झालेले आहे. जीवनशैलीच्या आजारांमध्ये लिव्हर, किडनी, हार्मोनल असमतोल, हृदयरोग, मानसव्याधी, पोटाचे आजार व हाडांचे आजार यावर कित्येक रुग्णांना लाभ दिलेला आहे. त्यांचे चिकित्सा करतेवेळी आलेल्या अनुभवांनीयुक्त स्वलिखित मी ब्रह्मांड आयुर्वेद बोलतोय…!! हे पुस्तक विशेष गाजले. या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झालेल्या असून यास प्रस्तावना महाराष्ट्रभूषण कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी दिलेली आहे. आयुर्वेद क्षेत्रात काम करताना आयुर्वेदातील निकष आजच्या आधुनिक संशोधनानुसार (scientific research) मांडून रुग्णांवर उपचार करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. गेल्या बारा वर्षांमध्ये कित्येक रुग्णांनी याचा लाभ घेतलेला असून एकाच शास्त्रावर अवलंबून न राहता डॉ. अक्षय यांनी योग, ज्योतिष, वास्तू व कर्म यांचा शास्त्राsक्त वापर वेळोवेळी रुग्णांवर करून आपली प्राचीन हिंदुस्थानी शास्र आजच्या आधुनिक कसोटीवर (scientific aspect) सिद्ध कशी आहेत हे वेळोवेळी जगासमोर मांडले. इथवर न थांबता आपल्या नंतरदेखील आयुर्वेद अविरत सुरू राहावा यासाठी कित्येक आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना तयार केले, जे आयुर्वेद क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत.






















































