
राज्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक तब्बल दोन महिने उशिरा आल्याच्या मुद्यावरुन राज्यात चांगलीच खिल्ली उडवली गेल्यानंतर आता केंद्रीय पथक केवळ चर्चा करण्यासाठी येतं, जाणून घेण्यासाठी येत नसतं. पूर्ण पाहणी करण्यासाठी पथक येत नसतं, असा अजब खुलासा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
पुण्यातील मांजरी येथे शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी हा खुलासा केला. ते म्हणाले, राज्य सरकारकडून निवेदन गेल्यानंतरच केंद्र सरकारचं पथक येतं. राज्य सरकारचं निवेदनच बऱयाच उशिरा गेलं होतं. केंद्रीय पथक केवळ चर्चा करण्यासाठी येतं, जाणून घेण्यासाठी येत नसतं.































































