
उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे सुपरस्टार रजनीकांत यांना आज तातडीने हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर येथे उपचार सुरू आहेत. रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय, रजनीकांत यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत, पण रक्तदाबाचा काही प्रमाणात त्रास आढळून आला आहे. त्यामुळे पुढील देखरेखीसाठी त्यांना रुग्णलयात भरती केले आहे.


























































