
इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला करोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक 25 नोव्हेंबर नंतर राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या संदर्भातील तपशील असा:
आज पर्यंत 1122 प्रवाशांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली.
यापैकी 16 प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात येत आहेत.
बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या 72 निकट सहवासितांपैकी 2 निकट सहवासित करोना बाधित आढळले आहेत.





























































