
इंजिनीयरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया जेईई-मेन परीक्षेमध्ये राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) बऱयाच सुधारणा केल्या. जेईई आता दोनऐवजी वर्षातून चार वेळा देता येणार आहे. त्याचप्रमाणे जेईईच्या स्वरूपातही महत्त्वपूर्ण बदल केले गेले. त्याबद्दल विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांनी घेरले होते. त्याची उत्तरे देऊन एनटीएने त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच अर्जावर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या चारही सत्रांना बसता येणार आहे.
जेईई चार वेळा घेतली जाणार त्याचा फायदा काय?
विद्यार्थ्यांना इंजिनीयरिंग प्रवेशासाठी आणखी संधी मिळतील आणि एका प्रयत्नात कमी गुण मिळाले तर दुसऱया प्रयत्नात ते आणखी चांगले गुण मिळवू शकतील.
पहिल्या प्रयत्नात अपयशी जरी ठरले तरी विद्यार्थ्यांना आपण कुठे कमी पडलो याचा अंदाज येईल.
एका प्रयत्नात अपयश आले तरी चार संधी असल्यामुळे विद्यार्थी पुढच्या संधींचे सोने करतील आणि त्यांचे वर्ष वाया जाणार नाही.
अनेकदा जेईई परीक्षेच्या दिवशीच बोर्डाच्या परीक्षा असतात. चार संधींमुळे ती संधी हुकली तरी दुसरी मिळेल आणि पुन्हा परीक्षा देण्यासाठी पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागणार नाही.
चार संधी असल्या तरी सर्वच्या सर्व चार वेळा परीक्षा देण्याची गरज नाही. तरीही विद्यार्थी एकापेक्षा जास्त परीक्षांना बसले तर ज्या परीक्षेत त्यांना सर्वाधिक गुण मिळाले तेच गुणवत्ता यादीसाठी गृहित धरले जाणार आहेत.
विद्यार्थी एकाच परीक्षेसाठी अर्ज करू शकतात की एकावेळी सर्व परीक्षांसाठी?
विद्यार्थी एका परीक्षेसाठी अर्ज करू शकतात किंवा मग फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे अशा चारही परीक्षांसाठी एकत्रित अर्ज करू शकतात आणि त्याप्रमाणे त्यांना परीक्षाशुल्कही भरावे लागेल.
प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्ररीत्या अर्ज केला जाऊ शकतो का?
सर्व चारही सत्रांसाठी एक अर्ज करता येईल. विद्यार्थ्याने एकदा भरलेला अर्ज त्याला प्रत्येक सत्रावेळी अर्ज करताना दिसेल.
फेब्रुवारीच्या सत्राला अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित सत्रांसाठी अर्ज करता येईल का?
होय. प्रत्येक सत्राच्या निकालानंतर पुढील सत्राच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खुली होईल.
चारही सत्रांची फी एकत्र भरावी लागेल का?
होय. अर्ज करताना विद्यार्थ्यांना परीक्षेचे सत्र निवडण्याचा पर्याय खुला असेल आणि त्यानुसार ते फीसुद्धा भरू शकतात.
जेईई-मेन (2021)चा अभ्यासक्रम बदलला आहे का?
जेईई-मेन (2021)चा अभ्यासक्रम हा गेल्या वर्षीप्रमाणेच असणार आहे. प्रश्नपत्रिका 90 प्रश्नांची असेल. विद्यार्थ्यांनी त्यातील फक्त 75 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. इतर 15 पर्यायी प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्ंकगही नसणार आहे.
बी. आर्प, बी. प्लॅनिंगची प्रवेश परीक्षा देणाऱयांना जेईईच्या फक्त दोनच संधी
विद्यार्थी जेईईच्या चारही सत्रांना बसू शकतात असे जरी एनटीएने सांगितले असले तरी बॅचलर ऑफ इंजिनीयरींग (बीई) किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी. टेक) अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाच या चार संधींचा लाभ घेता येणार आहे. बॅचलर ऑफ आर्पिटेक्चर (बी. आर्प) आणि बॅचलर ऑफ प्लॅनिंग (बी. प्लॅनिंग) अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना फक्त दोनच सत्रांना बसता येईल असे एनटीएने स्पष्ट केले आहे. बी. आर्प आणि बी. प्लॅनिंगच्या विद्यार्थ्यांसाठी जेईई परीक्षा फक्त फेब्रुवारी आणि मे महिन्यात होणार आहेत.




























































