
मुंबईतील कांदिवली भागातल्या चारकोप येथे एका मंदिराला आग लागल्याचं वृत्त आहे. रविवारी पहाटे झालेल्या या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
चारकोप येथील बंदर पाखाडी मार्गावरील साई बाबा मंदिरात ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. पहाटे 4.14च्या सुमाराला लागलेल्या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन ही आग विझवली.
सुभाष खोडे (25) आणि युवराज पवार (25) अशी मृत्यू पावलेल्या दोघांची नावं आहेत. तर मन्नु राधेश्याम गुप्ता (26) असं जखमी झालेल्या व्यक्तिचं नाव आहे. मन्नू हा 90-95 टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



























































