जंगलाचा राजा म्हणजे सिंह.आता राजा म्हटला म्हणजे त्याची कर्तबगारीही तशीच असायला हवी. त्याच्या एका पंजाच्या तडाख्यात शिकार खाली कोसळलीच पाहिजे. त्यामुळे सिंहाचा जंगलात दबदबा असतो. सिंहाची चाहूल लागताच सर्व प्राणी चिडीचूप होऊन सुरक्षित जागेचा शोध घेतात. सिंह शिकारीच्या थेट मानेवरच हल्ला चढवतो. तोंडात भक्ष्याची मान पकडल्यावर प्राणी गतप्राण होतो आणि सिंह शिकार फस्त करतो.
जंगलाच्या राजा असलेल्या सिंहालाच हरणाने चकवा दिला तर..विश्वास बसत नाही ना…मग हा व्हिडीओ बघा. पाणवठ्यावर आलेल्या हरणावर सिंह हल्ला चढवतो. मात्र, सिंहालाच चकवा देत हरीण सहीसलामत कसा निसिटतो आणि हरिणाची चपळाई या व्हिडीओमध्ये दिसत आहे.




























































