
बॉलीवूडचा हॅण्डसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन लवकरच डिजिटल डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. या वेबसिरिजसाठी हृतिकला तब्बल 75 कोटी रुपये मानधन मिळाल्याची जोरदार चर्चा आहे.
ही वेबसिरिज द नाईट मिरर या ब्रिटिश टीव्ही मालिकेचा हिंदी रिमेक आहे. ही मालिका गुप्तहेर संघटनेच्या काम करण्याच्या शैलीवर आधारित आहे. यात हृतिक गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार असून तो एका सिक्रेट मिशनवर काम करताना दिसणार आहे. या वेबसिरिजचे नाव अद्याप ठरले नसून सध्या पटकथेवर काम सुरू आहे. पुढच्या वर्षी मार्चपर्यंत शूटिंगला सुरुवात होण्याचा अंदाज आहे.

























































