
कोरोनाचं सावट असलं तरी ख्रिसमसची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक विविध चौपाटय़ांवर गर्दी करतायत. या पार्श्वभूमीवर थ्रीडी वाळूशिल्पाद्वारे कोरोनाविषयक जनजागृती करण्यात आलीय. प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी हे शिल्प साकारलंय. पुरी बीचवर 6 हजार वर्गफूट जागेवर 120 फूट लांब आणि 50 फूट रुंदीचे हे भव्य वाळूशिल्प पर्यटकांचं लक्ष वेधून घेतंय. यात दोन सांताक्लॉजने हातात मास्क पकडला असून त्यावर ’मास्क वापरा, सुरक्षित राहा’ असा संदेश दिला आहे.




























































