नवीन वर्ष लाँग विकेन्डचे, 2021 साली सलग सुट्ट्यांची चंगळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये अनेकांची फिरायला जाण्याची संधी हुकली आहे. अनेकांना आपले पर्यटनाचे प्लॅन गुंडाळून ठेवावे लागले. त्यामुळे नवीन वर्षात तरी भटपंतीची संधी मिळतेय का, या दृष्टीने पॅलेंडरची पाने चाळायला सुरुवात झाली आहे. अशा लोकांसाठी निश्चितच चांगली बाब म्हणजे 2021 साली अनेक लाँग विपेंड येणार आहेत. एखादी सुट्टी टाकून चार दिवसांच्या सहलींचे नियोजन नक्कीच करता येईल.

रिझर्व्ह बँकेने नवीन वर्षांतील सुट्टय़ांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार वर्षभर बँका 56 दिवस बंद असतील. जानेवारी 2021 मध्ये देशभरात बँकांना 14 दिवस सुट्टी असेल. या राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्टय़ा आहेत. यामध्ये चार रविवार, दुसरा आणि चौथा शनिवारचा समावेश असेल. याव्यतिरिक्त 1 जानेवारी नववर्ष, 2 जानेवारी- नववर्ष सेलिब्रेशन, (आयझोल), 14 जानेवारी मकरसंक्राती (अहमदाबाद, चेन्नई, गंगटोक, हैदराबाद), 15 जानेवारी तिरुवल्लूर डे, माघ बिहू, तुसू पूजा (चेन्नई, गुवाहाटी), 16 जानेवारी उजहवर तिरूनल (आयझोल), 25 जानेवारी इमोनू इरित्पा, इंफाळ, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन अशा या सुट्टय़ा आहेत.

जानेवारी – जानेवारीत दोन वेळा लाँग विकेन्डचा अनुभव घेता येणार आहे. मकर संक्रात गुरुवारी 14 जानेवारीला आहे. 15 जानेवारीला शुक्रवारी एक सुट्टी घेतली, तर त्यानंतर शनिवारी आणि रविवार असे तब्बल चार दिवस सुट्टी मिळू शकते. प्रजासत्ताक दिन मंगळवारी आहे. त्यामुळे सोमवारी रजा टाकून शनिवार ते मंगळवार असे चार दिवस सुट्टी घेऊ शकता.

मार्च – गुरुवार, 11 मार्चला महाशिवरात्रीची सुट्टी आहे. त्यानंतर जर शुक्रवारी एक सुट्टी घेतली तर पुढचा शनिवार-रविवार मिळून चार दिवस बाहेर फिरायला जाता येऊ शकते.

मे – मे महिन्यात 13 तारखेला ईद आहे. त्यानंतर तुम्ही शुक्रवारी सुट्टी घेऊन 13 मे ते 16 मेपर्यंत सुट्टय़ा एन्जॉय करू शकता.

जुलै – येत्या 20 जुलैला मंगळवारी ईदची सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी तुम्ही एक दिवस सुट्टी घेऊन चार दिवस बाहेर जाऊ शकता.

नोव्हेंबर – 4 नोव्हेंबरला गुरुवारी दिवाऴीची सुट्टी आहे. त्यामुळे जर तुम्ही शुक्रवारी सुट्टी घेतली तर पुढील शनिवार रविवारची सुट्टी घेऊन फिरण्याचे प्लॅन करू शकता.