बॉक्सिंग डे कसोटीत ‘टीम इंडिया’चा पंच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅडलेड कसोटीतील मानहानीकारक पराभवानंतर हिंदुस्थानी क्रिकेट संघाने राखेतून उठून फिनिक्स भरारी घेताना मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाला जबरदस्त पंच लगावला. दुसरा कसोटी क्रिकेट सामना 8 गडी राखून जिंकत ‘टीम इंडिया’ने चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. शतकी खेळी करून कर्णधार पदाला जागलेला अजिंक्य रहाणे या सामन्याचा मानकरी ठरला. ‘टीम इंडिया’ने मागील 6 वर्षांपासून बॉक्सिंग डे कसोटीत हार पत्करलेली नाहीये. ऑस्ट्रेलियाला 195 धावांवर रोखल्यानंतर हिंदुस्थानने 115.1 षटकांत 326 धावसंख्येपर्यंत मजल मारून पहिल्या डावात 131 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला दुसऱया डावातही 103.1 षटकांत 200 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. हिंदुस्थानने मिळालेले 70 धावांचे लक्ष्य 15.5 षटकांत 2 फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले.