जोगेश्वरी व अंधेरीतील प्राचीन गुंफांचा विकास होणार, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोगेश्वरी व अंधेरी महाकाली गुंफांचा विकास, आरे कॉलनी येथील संरक्षित पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन अशा विविध प्रलंबित कामांच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.

जोगेश्वरीतील विविध प्रलंबित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर बैठक आयोजित केली होती. या बैठकीत छोटा काश्मीर, आरे उद्यान येथे पर्यटन विकास करणे, जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे सक्षमीकरण करणे, आरे शासकीय रुग्णालय महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे, आरे डेअरी पूर्ववत सुरू करणे, फोर्स वन हद्दीतील केल्टी पाडा व चाफ्याचा पाडा येथील आदिवासींचे पुनर्वसन करणे, जोगेश्वरी येथे मनपा कार्यालयासाठी नवी इमारत अशा विषयांवर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांकडून माहिती घेतली व सूचना दिल्या.

या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र वायकर, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव पशुसंवर्धन व दुग्धविकास अनुप कुमार, मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल, पोलीस कायदा व सुव्यस्था विभागाचे सह आयुक्त विश्वास-नांगरे पाटील उपस्थित होते.