
क्रिकेटविश्वातील रथी-महारथी फलंदाज ज्या गोलंदाजाला टरकून असतात त्या हिंदुस्थानच्या जसप्रीत बुमराहने आणखी एक कमाल केली. कसोटी क्रिकेटमध्ये 50 वर्षांच्या इतिहासात सर्वात पंजूष सरासरीने 75हून अधिक बळी टिपणारा तो वेगवान गोलंदाज ठरलाय. या बाबतीत बुमराहने माल्कम मार्शल, कर्टनी अॅम्ब्रोस, जोएल गार्नर या वेस्ट इंडीजच्या महान गोलंदाजांसह ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅग्रालाही मागे टाकले आहे.
मागील दौऱयावर 21 बळी
जसप्रीत बुमराहने मागील 2018-19 च्या ऑस्ट्रेलिया दौऱयावर 21 कसोटी बळी टिपले होते. यावेळी दोन कसोटींत त्याने 8 फलंदाजांना बाद केले आहे. मागील दौऱयावरील बळींचा विक्रम मोडण्यासाठी बुमराहला उर्वरित दोन कसोटींत 14 बळींची गरज आहे. त्याने तीन वर्षांच्या छोटय़ाशा कसोटी कारकीर्दीत स्वतःचा वेगळा दबदबा निर्माण केला. या मॅचविनर गोलंदाजाचा कसोटीत स्ट्राइक रेट 46.14 इतका आहे. म्हणेजच बुमराहने आठव्या षटकात बळी टिपलेला आहे.
16 कसोटींत 75 बळी
जसप्रीत बुमराहला 75 कसोटी बळी मिळविण्यासाठी 16 सामने खेळावे लागले. विंडीजच्या जोएल गार्नर यांनी 15व्या कसोटीतच 75 बळींचा आकडा गाठला होता. पहिले 75 बळी मिळविण्यासाठी अॅम्ब्रोस यांना 20 कसोटी सामने खेळावे लागले. मार्शल यांनी 22 कसोटींत, तर ग्लेन मॅग्राने 19 कसोटींत 75 बळींचा आकडा गाठला हेता.




























































