सरपंचपदाच्या बोलीची चौकशी करावी, हसन मुश्रीफ यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात जानेवारी महिन्यात होणाऱया ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी बोली लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा पद्धतीने सरपंचपदासाठी बोली लागणे लोकशाहीसाठी घातक असून या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

नाशिकमध्ये अडीच कोटींची बोली

नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या बोलीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या ठिकाणी प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील कॅनलने 2 कोटी 5 लाख रुपयांची बोली लावल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले.