
बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील 1 लाख 20 हजारांचा ऐवज चोरून नेला. त्याशिवाय एका ब्युटी पार्लरमध्येही चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास डेक्कनमधील गणेशवाडीतील शुभायन अपार्टमेंटमध्ये घडली. अमित गुप्ता (वय 43) यांनी तक्रार दाखल केली आहे.
अमित शुभायन सोसायटीत राहायला आहेत. दोन दिवसांपुर्वी ते कुटूंबीयांसह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून 1 लाख 20 हजारांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी त्यांच्या शेजारी असलेल्या आय टू कॅन ब्यूटी पार्लरमध्येही चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब झरेकर अधिक तपास करीत आहेत.






























































