
2021 सुरुवात झाली आणि बॉलीवुडच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देणारी एक बातमी आली आहे. नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणने आपल्या सर्व इंस्टापोस्ट डिलिट केल्या आहेत. इतकंच नाही तर तिने आपले ट्वीट देखील डिलीट केले आहेत.
दिग्गज कलाकारांचे अकाउंट हॅक होण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. अशातच दीपिकाने पोस्ट आणि ट्विट डिलिट केल्याने चाहत्यांना चिंता वाटणं सहाजिक आहे. दीपिकाने पोस्ट का डिलिट केल्या असा प्रश्न साऱ्यांनाच पडल्या आहेत.
नव वर्षाच्या या दिवशी दीपिकाचे इंस्टा अकाउंट पाहिले तर झिरो पोस्ट दिसल्या. इंस्टा स्टोरी मात्र अजूनही दिसते आहे. खुद्द दीपिकाने याचं कारण सांगितलेलं नाही, मात्र अनेक प्रकारच्या कारणांची चर्चा सध्या सुरू आहेत.
काही जणांच्या म्हणण्यानुसार दीपिका एका विशेष प्रोजेक्टवर काम करत आहे. तिने प्रोफाइल फोटो ही बदलला आहे. असं सांगण्यात येत आहे की कदाचित हा प्रमोशनचा भाग आहे.
दीपिकाच्या इन्स्टाग्रामवर 52.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर देखील ती प्रसिद्ध आहे. असं असताना देखील तिने पोस्ट, ट्विट डिलिट केल्याने सारेच आश्चर्यचकीत झाले आहेत.
दीपिका पदुकोण सध्या रणवीर सोबत राजस्थानमध्ये आहे. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी ते राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत, असं सांगितलं जात आहे.

























































