लातूरमध्ये सापडलेले हातबॉम्ब निकामी करण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद जवळील पाझर तलावात शनिवारी हातबॉम्ब सापडले होते. रविवारी दुपारी दोन ते सव्वा दोन च्या सुमारास लातुर येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाने  नांदेड येथील पथकास पाचारण करून हातबॉम्ब निकामी केला. यामुळे मोठी संकट टळले.

शनिवारी सकाळच्या दहा च्या सुमारास महादेववाडी येथील रहिवासी तुळशीराम ज्ञानोबा वलसे यांना बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचे लक्षात येताच त्यांनी शिरूर ताजबंद येथील बीट अंमलदार वैजेनाथ समुखराव यांना माहिती दिली. घटनास्थळी  अहमदपूर पोलीस स्टेशन चे सुनील बिर्ला यांनी लातूर बॉम्ब शोधक व नाशक पथकास पाचारण करून तत्काळ बोलावून घेतले.

बॉम्ब शोधक पथकाने पाहणी करून त्यावर नियंत्रण मिळविले. यामुळे कुठलीच हानी झाली नाही.परंतु शनिवारी रात्री उशिरापर्यंत बॉम्ब निकामी होईल अशी अपेक्षा जनतेला होती पण तसे झाले नाही.

नागपुर-रत्नागिरी, पुणे, मुंबई,बिदर, निजामाबाद आणि हैद्राराबाद येथुन ये-जा करणारी वाहनांची वर्दळ दिवस रात्र असते. हा हातबॉम्ब कुठुन, कधी, कसा आणि कोणी टाकला या बाबत ची माहिती अजून तरी समोर आली नाही. रविवारी दुपारी दोन ते अडीच च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर दीड ते दोन किमी अंतरावर वाहतूक बंद करून हातबॉम्ब निकामी करण्यात आला.