अक्षयच्या Fau-G गेमचे गाणे रिलीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षी चिनी गेम पबजीवर बंदी आल्यानंतर अभिनेता अक्षयपुमारने देशी गेमिंग कंपनीसोबत Fau-G गेम लाँच करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता अक्षयने या गेमचे गाणे सोशल मीडियावर रिलीज केले आहे. लवकरच प्रजासत्ताक दिनी Fau-G गेमचे लाँचिंग होणार आहे.

Fau-G गेम खेळणाऱयांना देशातील जवानांच्या बलिदानाची माहिती देखील मिळणार आहे. अक्षयचे हे पहिले गेमिंग व्हेंचर आहे. या मोबाईल गेममधून मिळणाऱया महसुलाचा 20 टक्के हिस्सा भारत के वीर ट्रस्ट या उपक्रमाला देणगी दिला जाणार आहे.

समस्या देशात असू दे किंवा देशाच्या सीमेवर. हिंदुस्थानचे वीर नेहमी उभे राहतात. ते निर्भय रक्षक आहेत. या Fau-G अँथमचे साक्षीदार व्हा, अशी पोस्ट अक्षयने लिहिली आहे. Fau-G गेमच्या व्हिडियोत 14 हजार फूट उंच गलवान खोरे दाखवण्यात आले आहे. Fau-G दी गेमचे पूर्ण नाव फियरलेस अँड युनायटेड गार्ड्स आहे. प्री रजिस्ट्रेशनसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. जे युजर्स प्री रजिस्टर्ड करतील, त्यांना एक पुश मॅसेज मिळेल. त्यावरून गेम डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे की नाही, समजेल.