शेतीत रस नाही, कायद्यांशी संबंध नाही; रिलायन्सचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्या कृषी कायद्यांशी आमचा काही संबंध नाही. रिलायन्स शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करत नाही किंवा कंत्राटी शेतीच्या व्यवसायात नाही. तसेच, भविष्यातही कंपनीचा असा कुठलाही हेतू नसल्याचे रिलायन्सने स्पष्ट केले आहे.

हरयाणा, पंजाबमध्ये कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी रिलायन्स जीओच्या टॉवरची मोडतोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर रिलायन्स जियो इन्पह्कॉम लिमिटेडकडून पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. रिलायन्सचे नाव कृषी कायद्याशी जोडून आपल्या व्यवसायाची हानी आणि आपली प्रतिष्ठा खराब करण्याचा एकमेव हेतू यामागे असल्याचे रिलायन्सने म्हटले आहे.

काय आहे रिलायन्सचे म्हणणे

  • रिलायन्स किंवा अन्य सहाय्यक कंपनी कॉर्पोरेट किंवा कॉन्ट्रक्ट फार्मिंग करत नाही. पुढेही असा कुठलाही हेतू
  • नाही. कंपनीने पंजाब, हरयाणा किंवा देशभरात कुठेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने खरेदी केलेली नाही.