कराड – घोरपडीची शिकार करून मांस शिजवल्या प्रकरणी तीन जण ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वन्यजीव घोरपडची शिकार करून घोरपडीचे मांस चुलीवर शिजवणाऱ्यांना तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी रोजी वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे यांच्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे वनविभागाने सदरची कारवाई केली आहे. पांढरेवाडी – वजरोशी (ता. पाटण) येथील विनोद घाडगे नामक व्यक्तीने फडतरवाडी (घोट) येथे शिकार करून आणलेली मॄत्त घोरपडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या माहितीच्या आधाराने वनविभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल अशोक राऊत, वनपाल सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधव, रवींद्र कदम, वनरक्षक अरविंद जाधव यांनी सापळा रचून फरतरवाडी येथून विनोद घाडगे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीअंती वन्यजीव घोरपड असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी आरोपी भाऊ गंगाराम साळुंखे, गणपत मारुती साळुंखे, सौ सिंधू गणपत साळुंखे यांच्या राहते घरातून घोरपडीचे चुलीवर शिजवलेले मटण, ॲल्युमिनियमची पातेले, कोयता व लाकडी ठोकळा जप्त केले आहे.

सदर घटनेचा पंचनामा केला असून आरोपी यांच्याविरुद्ध भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9, 39,44,44(अ) व 51 गुन्हा नोंदविला आहे. सातारचे वनसंरक्षककिरण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा अधिक तपास सुरू आहे.