मोटारसायकलच्या डिक्कीतून 4 लाख 30 हजार रुपये पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

लातूर तालुक्यातील मुरुड येथे मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवलेले 4 लाख 30 हजार रुपये अज्ञात व्यक्तीने पळवल्याची घटना घडली. याबाबत प्रशांत वामनराव खोसे (रा.माटेफळ ता.लातूर) यांनी मुरुड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार दिली आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी मुरुड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमधून रोख 4 लाख 30 हजार रुपये काढले. सदरील रक्कम त्यांनी आपल्या मोटारसायकल (क्रमांक एम.एच. 24 ए.एम. 1677) च्या डिक्कीमध्ये ठेवली होती. अज्ञात व्यक्तीने मोटारसायकलच्या डिक्कीमधील ही रक्कम चोरुन नेली. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी सय्यद करीत आहेत.