
किल्लारी येथे चालू असलेला जनावरांचा आठवडी बाजार मागील बर्याच दिवसापासून बंद होता. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधारणपणे एक वर्षे लोटला. हा बाजार रविवार पासून सुरू करण्यात येणार आहे.
किल्लारी हे व्यापारीदृष्ट्या खुप मोठी बाजारपेठ असल्याने इथे औसा,निलंगा,उमरगा,लोहारा आदी तालुक्यातील शेतकरी व्यापारी मोठ्या प्रमाणावर जनावरांची उलाढाल करतात. त्यामुळे किल्लारी ग्रामपंचायतीच्या महसुलातही वाढ होत असते.
हा बाजार बंद पडल्याने अनेक शेतकऱ्यांना आपले पशुधन विक्री किंवा खरेदी करण्यासाठी बाहेरगावी बाजार शोधावा लाग होता. कृषी उत्पन्न बाजार समिती औसाच्या उपसभापतीपदी किल्लारीच्या किशोर जाधव या युवकाची निवड झाली आणी त्यांच्या प्रयत्नातुन पुन्हा किल्लारीच्या पूर्व बाजूस दिनांक रविवारपासुन बाजार भरवण्याचा निर्णय मुख्य प्रशासक राजेंद्र भोसले व उप मुख्यप्रशासक किशोर जाधव ,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी घेतला आहे. परिसरातील शेतकरी व व्यापारी यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ही करण्यात आले आहे.





























































