
मुलांच्या हातात सॅनिटायझर देत असाल तर सावधान. सॅनिटायझर ही खेळण्याची वस्तू नसून त्याच्याशी खेळ तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या जीवावर बेतू शकते. याचे ताजे उदाहरण घडले आहेत ते इंदूरमध्ये. या शहरात राहणाऱ्या एका मुलाचा सॅनिटायझरच्या स्फोटात मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे.
विशेष पांचाळ असे या मुलाचे नाव असून 7 जानेवारीला ही घटना घडली आहे. विशेष त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता त्याला खोडकरपणा सुचला आणि त्याने मित्रांना काहीतरी भन्नाट करुन दाखवण्यासाठी पेटलेली काडेपेटी हातात पकडलेल्या सॅनिटायझरच्या बाटलीत टाकली. सॅनिटायझरचा एकच भडका उडून स्फोट झाला. तो इतका भीषण होता की त्यात विशेष होरपळला. त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्याला रविवारी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण अवघ्या तासाभरात त्याचा मृत्यू झाला. या स्फोटात विशेष 50 ते 52 टक्के भाजला होता. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.


























































