मुंबईत दिवसभरात 182 पक्ष्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

मुंबईत विविध भागांत कावळे आणि कबुतरांच्या मृत्यूचे सत्र सुरू असून गेल्या 24 तासांत182 पक्ष्यांचा मृत्यू झाला. मुंबईत 10 जानेवारीपासून आतापर्यंत 1,660 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्ल्यूच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार आणि मुंबई महापालिका सतर्क झाले असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. मात्र, मुंबईला बर्ड फ्ल्यूचा धोका नसला तरी गेले काही दिवस कावळे आणि कबुतरांचा मृत्यू होत असून सोमवार, सकाळी 7 ते मंगळवार सकाळी 7 वाजेपर्यंत 182 पक्ष्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पालिकेच्या आपात्कालीन नियंत्रण कक्षाने दिली.