
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभागप्रमुख, आमदार सुनील प्रभू यांनी दिंडोशी येथे साहेब उत्सव आयोजित केला आहे. या उत्सवांतर्गत युवासेनेने आयोजित केलेल्या आमदार चषक स्पर्धेला उंदड प्रतिसाद मिळाला असून आज विजेत्या संघाचा अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते चषक आणि पोरितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
दिंडोशी विधानसभा क्षेत्रात 17 ते 31 जानेवारीदरम्यान साहेब उत्सव 2021 सुरू असून त्यात कला, क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. त्यानुसार आमदार चषक क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज मोठय़ा उत्साहात पार पडला. या वेळी आमदार सुनील प्रभू, उपमहापौर सुहास वाडकर, नगरसेविका, विभाग संघटक साधना माने, विनया सावंत, नगरसेवक आत्माराम चाचे, विधानसभा संघटक विष्णू सावंत, प्रशांत कदम, सिनेट सदस्य सुप्रिया कारंडे, युवासेनेचे समद्ध शिर्के, रमेश सोलंकी आदी उपस्थित होते.



























































