
राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय माहितीपट स्पर्धा आयोजित करण्यात आली आली आहे. त्यानुसार वंदनीय शिवसेनाप्रमुख व माननीय शिवसेना पक्षप्रमुख यांच्या जीवन आणि कार्यशैलीवर आधारित तसेच महाराष्ट्राच्या जडणघडणीसंदर्भातील माहितीपटाच्या या स्पर्धेला मुंबईसह महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच या स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असलेल्या स्पर्धकांनी 31 जानेवारीपर्यंत आपला माहितीपट पाठवणे आवश्यक आहे.
शिवसेनेच्या वतीने दरवर्षी वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. परंतु यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वक्तृत्व स्पर्धेएवजी वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय माहितीपट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांसाठी खुली असल्याने स्पर्धेकरिता राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठय़ा संख्येने स्पर्धक माहितीपट बनवून sahebdocume-tary@ gmail.com या ईमेलवर पाठवत आहेत. अद्यापही ज्या स्पर्धकांना या माहितीपट स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी 31 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत आपला माहितीपट अटी व शर्तींच्या अधीन राहून पाठवावा. स्पर्धेतील अंतिम पाच विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत 1800228595 या क्रमांकावर संपर्प साधावा.
माहितीपट स्पर्धेचे नियम, अटी
– स्पर्धा विनाशुल्क आहे. – सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. – परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. – स्पर्धेकरिता एकच खुला गट आहे. – माहितीपट कमीत कमी 3 मिनिटे व जास्तीत जास्त 5 मिनिटांचा असावा.
– चित्रीकरणाचा व आवाजाचा दर्जा चांगला असावा. – दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर स्पर्धकांनी आपला माहितीपट sahebdocume-tary @gmail.com या ईमेलवर पाठवावा. प्रवेश स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2021 (रात्री 12 वाजेपर्यंत). – माहितीपट पाठवताना स्पर्धकाने ईमेलमध्ये आपले नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि व्हॉट्सअॅप क्रमांक नमूद करावा. – संपर्प क्रमांक 1800228595.
माहितीपट स्पर्धेचे विषय
– वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. – लोकनायक माननीय उद्धवजी ठाकरे. – माझा महाराष्ट्र, माझा अभिमान





























































