
2020 मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव टिक टॉकसह 59 चायनीज ऍप हिंदुस्थानात बॅन करण्यात आले होते. हे ऍप आज उद्या सुरू होतील अशी आशा होती. परंतु हे ऍप पूर्णपणे बंद होणार असल्याचे समोर आले असून टिक टॉक चालवणारी कंपनी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे.
टिक टॉकची कंपनी बाईट डान्सने हिंदुस्थानातून गाशा गुंडाळण्याची तयारी केली आहे. त्यामुळे दोन हजार कर्मचार्यांवर बेकारीची कुर्हाड कोसळणार आहे. टिक टॉकवर कायम बॅन असल्याने बाईट डान्स कंपनीने ही घोषणा केली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी कर्मचार्यांना इमेल करून ही माहिती दिली आहे. टिक टॉकवर बॅन येण्यापूर्वी हिंदुस्थान या ऍपचे 20 कोटीहून अधिक युजर होते.
कंपनीचे प्रवक्ते म्हणाले की गेल्या 7 महिन्यांपासून आम्ही सरकारकडे या बाबत पाठपुरावा करूनही ऍप्स सुरू करण्याठी आम्हाला स्पष्ट निर्देश मिळाले नाहीत. गेली सात महिने देशात ऍप्स बंद आहेत. अशा वेळी दोन हजारहोन अधिक कर्मचार्यांना कामावरून काढण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही.
कंपनीकडून पाठवलेल्या इमेलमध्ये म्हटले आहे की, ऍप्स कधी सुरू होईल याबाबत काही माहित नाही. बुधवारी एका बैठकीत हिंदुस्थानातील कंपनीचा कारभार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनी कर्मचार्यांना तीन महिन्या पगार आणि सर्वे भत्तेही देणार आहेत.
2020 मध्ये गलवान खोर्यात हिंदुस्थानी आणि चीनच्या सैनिकांची झटापट झाली. या झटापटीत हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर हिंदुस्थानच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हा हिंदुस्थान सरकारने लोकप्रिय ऍप टिक टॉकसह 59 चायनीज ऍपवर बंदी घातली होती. आज ना उद्या हे ऍप सुरू होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. परंतु आता बाईट डान्सने कर्मचारी कपात करून गाशा गुंडाळण्याची तयारी केली आहे.




























































