प्रबोधन कुर्ला शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रबोधन कुर्ला शाळेच्या प्रांगणामध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी डॉक्टर ‘डॉन’ मालिकेत भूमिका करणारे शाळेचे विद्यार्थी गिरिजा गोळे, आर्या कांगडे, सिद्धेश लोकरे यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, दैनिक ‘शिवनेर’चे संपादक नरेंद्र वाबळे उपस्थित होते. याप्रसंगी वाबळे यांनी वक्तृत्वामध्ये पुनः पुन्हा अपयशी ठरूनसुद्धा शालेय जीवनात मुंबई जिह्यातून शिक्षकांच्या प्रेरणेमुळे ते पहिले आले हा प्रसंग आवर्जून सांगितला. तसेच आदर्श राष्ट्रनिर्मितीत चांगल्या विद्यार्थ्यांची कशी आवश्यकता आहे व त्यासाठी शिक्षकाची भूमिका किती महत्त्वाची आहे हेदेखील त्यांनी नमूद केले.
प्रबोधन कुर्ला संस्थेचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर यांनी शाळेचे विद्यार्थी पत्रकारितेत पुढे यावेत व त्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी वाबळे यांच्याकडे केली.

याप्रसंगी सहाय्यक शिक्षक सुरेश जाधव, मुख्याध्यापिका विशाखा परब, विद्या फलके यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शलाका कोरगावकर व संस्थेचे पदाधिकारी नीलेश कोरगावकरही उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन शिर्के व प्रास्ताविक अंजली कांबळे, शुभांगी मेमाणे व आभार भरत पाटील यांनी मानले.