कोरोनाला हरवण्यासाठी भारत सीरम सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपली रोगप्रतिकारकशक्ती गरजेपेक्षा जास्त सक्रिय होऊन रोगांशी लढण्याऐवजी स्वतःच्याच शरीराचे नुकसान करते त्याला सायटोकाईन स्टॉम म्हणतात. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे हेच मुख्य कारण आहे. सायटोकाईन स्टॉमला प्रतिबंध करण्यासाठी भारत सीरम आणि व्हॅक्सिन्स (बीएसव्ही) ही कंपनी एआरडीएस रुग्णांसाठी युलिनास्टॅटिनचा तिसऱ्या टप्प्यातील अभ्यास असल्याची माहिती भारत सीरमचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नवांगुल यांनी दिली. याशिवाय कोरोनाविरोधात लढण्यासाठी इक्वाईन पोलिक्लोनल अँटिबॉडी विकसित करण्यासाठी कंपनीने संशोधन प्रकल्प सुरू केला आहे. अँटिजेन्स वापरून घोड्यांमध्ये कोरोनाविरोधी पोलिक्लोनल अँटिबॉडीज निर्माण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प डिझाईन केला आहे. या दोन्ही चाचण्यांचे निष्कर्ष येत्या काही महिन्यांत येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.