भांडूपमध्ये इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

भांडुप सोनापुरजवळच्या अंजनी कुमार इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये गुरुवारी रात्री कापडाच्या गोडाऊनला आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या, 4 जम्बो वॉटर टँकर, 2 वॉटर टँकर, एक रेस्क्यु वाहनासह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

सुमारे दोन तास अग्निशमन दलाच्या जवानांनकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, ही आगीची तीव्रता जास्त होती. हे गोदाम जीन्सचे असल्याने आग मोठ्या प्रमाणत भडकली होती. अखेर दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस आणि अग्निशमन दल घेत आहे.