गोव्याहून आलेली पावणेचार लाखाची विदेशी दारू बीडमध्ये जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्याहून आणलेली विदेशी दारू विक्री करत असताना राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाने मध्यरात्री छापा मारून पावणेचार लाख रूपयाची 50 पेट्यांचा विदेशी दारूसाठा बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे जप्त केला.

शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथील रामराव कृष्णाजी जायभाये यांच्या घरात रात्री साडेबारा वाजता राज्य उत्पादन शुल्कच्या बीड आणि नगर जिल्ह्यातील विशेष पथकाने संयुक्तरित्या छापा मारून मोठी कारवाई केली. तब्बल 50 पेट्या विदेशी मद्याच्या जप्त करण्यात आल्या. या दारूची एकुण किंमत 3 लाख 65 हजार रूपयाच्या घरात आहे. ही कारवाई अत्यंत सावधगिरीने करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्कचे कांतीलाल उमाप, उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडचे नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली छापा मारून गोवा राज्याची दारू छुप्या पद्धतीने आणून विक्री केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरावर छापा पडताच सुत्रधार पसार झाला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे डी.एल.दिंडकर, नगरचे निरीक्षक यांच्यासह पथकाने केली.