
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर, अर्थ मंत्रालयातून राष्ट्रपती भवनात दाखल झाले. अर्थमंत्री आज संसदेत देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोविड-19 मुळे यंदाचा अर्थसंकल्प पहल्यांदाच पेपरलेस असणार आहे. अर्थमंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार यंदा मेड-इन-इंडिया टॅबलेटद्वारे अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. Budget2021 ची सॉफ्ट कॉपी, ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
यंदा कोरोनाचे संकट लक्षात घेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पेपरचा वापर करण्यात येणार नाही. त्याऐवजी टॅबलेटचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी वापरण्यात आलेला टॅबलेट हा मेड – इन – इंडिया आहे. तसेच संसदेच्या सदस्यांनाही अर्थसंकल्प हा सॉफ्ट कॉपीच्या रुपाने मिळणार आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेची सुरुवात अर्थमंत्रालयाने या निर्णयातून दाखवून दिल्याचे बोलले जात आहे.



























































