दात आणि हिरड्यांच्या मजबुतीसाठी रामबाण उपाय !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शारीरिक आरोग्यामध्ये दात आणि हिरड्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. हल्ली लहान मुलांमध्येही दातांचे त्रास उद्भवतात. दातांना कीड लागणे, दातांचा पिवळेपणा, दातदुखी, हिरड्यांची सूज, काहीही खाल्लं दातांतून रक्त येणे, दात दुखणे अशा अनेक मौखिक तक्रारींवर काही घरगुती उपाय गुणकारी ठरतात.

– दातांसाठी फक्त ब्रश करणे पुरेसे नाही. आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने दातांना मजबुती मिळते. सकाळच्या वेळी भाजलेले तीळ खाल्ल्याने दात मजबूत होतात. हिरड्यांची सूजही कमी होते.

– तीळ हलकेसे भाजून घ्या. हे भाजलेले तीळ नियमित खा. तीळात भरपूर कॅल्शियम असते. त्यामुळे दात आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते. दातांचा पिवळेपणा दूर व्हायलाही मदत होते.

– दात आणि हिरड्यांच्या इतर समस्यांकरिता मीठ व कोमट पाण्याच्या गुळण्या करणे हा साधा सोपा उपाय आहे. यामुळे हिरड्यांची सूज कमी होते.

– लसणात एँण्डी बॅक्टेरियल गुणधर्म आहे. त्यामुळे दात, हिरड्यांच्या आरोग्याकरिता रोजच्या जेवणात लसणाचा समावेश करावा. तोंडातील रोगजंतू मरतात. त्यामुळे दातांना कीड लागणे, दातदुखी लागणारे या तक्रारी कमी होतात.