बुलढाणा जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंचांची निवडणुका 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाण जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुका जानेवारी महिन्यात पार पडल्या असून आता या सदस्यातून सरपंच, उपसरपंच पदाची निवडणुका 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान घेण्याचे आदेश प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश गिते यांनी ‘सामना’शी बोलताना दिले आहे.

त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुका 66, चिखली 99, मेहकर 97, नांदुरा 64, जळगाव जामोद 46, लोणार 59, मलकापूर 48, सिंदखेडराजा 79, देऊळगावराजा 114, मोताळा 64, शेगाव 45, संग्रामपूर 49, खामगाव 96 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच पदांचे रोष्टर सुद्धा नुकतेच जाहीर झाले असून सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी चुरस निर्माण झाली असून अनेक गावातील सदस्यांना घेऊन भावी सरपंच सहलीवर निघून गेले आहे.