क्राईम पेट्रोल मालिका पाहूनच केला खून, कोथरूडमधील अल्पवयीन खूनाची उकल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोथरूडमधील केळेवाडीतील अल्पवयीन मुलाच्या खूनाची उकल करण्यात तपास पथकाला यश आले आहे. खेळताना झालेल्या वादातून 13 वर्षीय मित्रानचे अल्पवीयन मित्राचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. क्राईम पेट्रोल मालिका पाहूनच त्याने खून केल्याचे उघडकीस आले आहे.

मैदानात खेळत असताना झालेल्या वादात ढकलून दिल्यानंतर अल्पवयीन मित्र डोक्यावर पडून जखमी झाला. त्यामुळे घरातील लोक रागवतील म्हणून त्याने मित्राच्या डोक्यात दगड मारून त्याला मातीच्या ढिगाऱ्यात पुरण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्वजित विनोद वंजारी (वय 11, रा. केळेवाडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

विश्विजत वंजारी 29 जानेवारीला सायंकाळी चारच्या नंतर बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला जात होता. ३१ जानेवारी रोजी दुपारी पौड रस्त्यावरील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा मृतदेह अर्धवट गाढलेला असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. मुलाच्या डोक्याला मार लागल्यामुळे खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार तपास करताना 13 वर्षाच्या मुलावर संशय निर्माण झाला होता. चौकशीत त्याने खूनाची कबुली दिली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील, दत्ता शिंदे, मनोज पवार, विजय कांबळे, कानवडे यांच्या पथकाने केली.

असा रचला खूनाचा डाव

विश्वजीत व आरोपी अल्पवयीन मुलगा हा मित्र होते. ते दोघे एकत्र खेळायचे. त्यावेळी त्यांच्यात वादावादी होत होती. घटनेच्या दिवशी देखील दोघे खेळत होते. त्यावेळी विश्वजित याने त्याला चिडविले. खेळताना सतत मला एकटे पाडतात, असे म्हणून त्यांच्यात वादावादी झाली. पकडा-पकडा खेळताना आरोपीने विश्वजीतचे नाक दाबले. त्यानंतर त्याला धक्का दिला. त्या ठिकाणी असलेल्या विटावर तो पडल्यामुळे डोक्याला गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्यामुळे आरोपी मुलगा घाबरला. आता घरचे रागवतील म्हणून त्याने आणखी एक दगड त्याच्या डोक्यावर टाकला. तो दिसू नये म्हणून त्याच्या अंगावर बाजूने दगडे रचली. त्या ठिकाणी सिंमेटचा राडारोडा टाकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुलास ताब्यात घेतले असून त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे.