निर्मलनगर-गांधीनगरच्या पुनर्विकासाचा आराखडा सादर करा, अनिल परब यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे येथील निर्मलनगर व गांधीनगर वसाहतींच्या पुनर्विकासासंदर्भात आराखडा तयार करण्याचे आदेश परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांनी आज दिले. या वसाहतींच्या विकासाच्या संदर्भात ऍड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.

म्हाडाच्यावतीने विकसित करण्यात येणाऱ्या निर्मलनगर, गांधीनगर या भागाचा आराखडा तयार करुन याबाबतचा प्रस्ताव लवकर सादर करावा. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत बैठक घेऊन यावर निर्णय घेण्यात येईल. वसाहतींच्या पुनर्विकासासंदर्भात स्थानिक लोकांच्या सूचना आणि त्यांच्या अडचणी काय आहेत या समजून घेऊन महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र प्राधिकरणाने (म्हाडा) त्याचा आराखडा तयार करावा आणि कालबद्ध पद्धतीने आखणी करून रखडलेल्या प्रकल्पांना चालना द्यावी, अशी सूचनाही अनिल परब यांनी केली.