पुणे – वायर तोडल्याच्या रागातून ठेकदाराकडून दोघांवर प्राणघातक हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वायर तोडण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनामध्ये धरून दोघांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या ठेकेदारासह त्याच्या दोन्ही मुलांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही घटना काल सकाळी अकराच्या सुमारास कात्रजमधील वाघजाईनगरमध्ये घडली.

नारायण ठाकरिया चव्हाण (वय – 52), गणेश नारायण चव्हाण (वय – 31) आणि व्यंकटेश नारायण चव्हाण (सर्व रा. आंबेगाव खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वसंत गायकवाड (वय – 41 रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.

वाघजाईनगरमधील नर्मदा सिटी बांधकाम साईटवर काम सुरु होते. त्यावेळी वायर तुटल्यामुळे ठेकेदार वसंत गायकवाड यांचे कामगार संजय शर्मा आणि बबलू शर्मा यांच्याशी चव्हाण यांनी भांडण केले. त्यानंतर त्याचा राग आल्यामुळे चव्हाण कुटूंबियांनी संजय आणि बबलू यांना रॉडने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले तपास करीत आहेत.