
राजस्थान रॉयल्सचा जलदगती गोलंदाज जयदेव उनाडकट हा मंगळवारी विवाहबंधनात अडकला. जयदेवने त्याच्या लग्नाबद्दल अखेरपर्यंत कुणालाही सांगितले नव्हते. लग्नानंतर त्याने सोशल मीडियावरून फोटो शेअर करत त्याबद्दल माहिती दिली.
जयदेव हा रिनीसोबत विवाहबंधनात अडकला आहे. मंगळवारी रात्री गुजारतमधील आणंद शहरातील मधुबन रिसोर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला दोन्हीकडील मोजकीच मंडळी उपस्थित होती. रिनी ही वकिल असून 15 मार्च 2020 रोजी दोघांचा साखरपुडा झाला होता.
जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्राच्या क्रिकेट संघाने गेल्या वर्षीचा रणजी करंडक जिंकला होता. डावखुरा मध्यमगती गोलंदाज जयदेव उनाडकटने या मालिकेत जबरदस्त कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला होता.




























































