सौदी अरेबियात हिंदुस्थानसह 20 देशांना विमानबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सौदी अरेबियात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून त्यामुळे स्थानिक प्रशासनाने हिंदुस्थानसह 20 देशांतील विमानांना बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाच्या अंतर्गत मंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

हिंदुस्थानशिवाय पाकिस्तान, अमेरिका, ब्राझील, जपान आणि अन्य देशांच्या प्रवासी विमानांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. ब्रिटन, इटली, पोर्तुगाल, फ्रान्स, स्वीडन, जर्मनी, आयर्लंड आणि स्वीत्झर्लंड या देशांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. सौदी अरेबियात आतापर्यंत 3 लाख 68 हजार नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. 6,400 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.