
जगातील बलाढ्य लष्कर असा टेंभा मिरवणाऱ्या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) मनात हिंदुस्थानी हवाई दलात सामील झालेल्या राफेल फायटर जेट विमानाची भीती घर करून आहे. त्यामुळेच लडाख सीमेवर त्यांनी आपल्या जे-20 या हायटेक लढाऊ विक्रमांची तैनाती केली आहे, असे स्पष्टीकरण हिंदुस्थानी हवाई दलप्रमुख एअर चिफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी गुरुवारी केला. लडाख सीमेवरून चीनने माघार घेतल्याच्या बातम्यांवर भदौरिया म्हणाले की, तैनातीच्या दृष्टीने चीनने काही बदल केले आहेत. काही ठिकाणी माघार घेतलीय. पण त्याचवेळी त्यांनी हवाई सुरक्षा कवच आणखी बळकट करून प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थितीनुसार आम्ही आमची तैनाती आणि तयारीमध्ये बदल करू. हिंदुस्थानी हवाई दल कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास सक्षम आहे असेही भदौरिया म्हणाले.

























































