
कोरोना अजून संपलेला नाही, तरी नागरिकांमध्ये गांभीर्य नाही, लोक मास्क लावत नाही असे सांगत अजित पवार यांनी बेजबाबदार नागरिकांबद्दल संताप व्यक्त केला.
पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. काळजी घेऊन, कोरोनाचे नियम पाळूनही गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली, मलाही कोरोनाची लागण झाली, कोरोना अजूनही गेलेला नाही म्हणून काळजी घ्या असे कळकळीचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.





























































