
धारणी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तांबे यांनी आज (7 फेब्रु) रोजी दुपारी 1 वाजता आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात त्यांनी वडील आणि पत्नीची माफी मागितली आहे. या प्रकरणी पुढील तपास धारणी पोलीस करीत आहे.

































































