
चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळला आहे. मोहुर्ली गावाशेजारी असणाऱ्या मुधोली जंगलाअंतर्गत शेत शिवारात हा मृतदेह आढळला आहे.
हा अडीच ते तीन वर्षे वयाचा नर वाघ असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वाघाच्या अंगावर मोठ्या जखमा आहेत. वन पथक घटनास्थळी पोहोचले असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. तसंच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. एखाद्या दुसऱ्या वाघाशी झालेल्या झुंजीत हा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ-
































































