
हिंदुस्थानात बुधवारी सलग दुसऱया दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली असून पेट्रोल प्रती लीटर 30 पैशांनी तर डिझेल 25 पैशांनी महागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत सुरु असलेली वाढ लक्षात घेता लवकरच या किंमती शंभरी पार जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, सलग दुसऱया दिवशी झालेल्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल आणि डिझेलची आतापर्यंतचे सर्वाधिक दर नोंदविण्यात आले आहे. मुंबईत बुधवारी प्रती लीटर पेट्रोलचे दर 94.12 रुपये तर डिझेलचे दर 84.63 रुपयांवर पोहचली.



























































