
घटस्फोट मागितला म्हणून एका पतीने त्याच्या पत्नीची गळा घोटून हत्या केल्याची घटना लेबनन देशात घडली आहे. सदर तरुणी ही लेबनन मधील प्रसिद्ध सौंदर्यवती असून आघाडीची मॉडेल आहे. तिच्या हत्येने मॉडेलिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
झैना कांजो असे त्या मॉडेलचे नाव असून तिने लेबनॉनमधील अनेक ब्युटी कॉन्टेस्ट जिंकले होते. झैना हिचे काही महिन्यांपूर्वीच इब्राहिम गझल याच्या लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर इब्राहिम तिला मारहाण करू लागला. त्यामुळे एकदा झैनाने त्याच्याविरोधात पोलिसांत घरगुती हिंसाचाराची तक्रार देखील दाखल केली होती. मात्र त्यानंतर इब्राहिमने तिची मनधरनी करत तक्रार मागे घ्यायला लावली. काही दिवस चांगले गेल्यावर पुन्हा एकदा इब्राहिम तिला मारहाण करू लागला. त्यामुळे तिने त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली.
झैना आता आपल्यासोबत घटस्फोट घेणार या विचारानेच इब्राहिम बैचेन झाला होता. त्यामुळे त्याने तिला घटस्फोट द्यायला नकार दिला. मात्र झैना ऐकतच नसल्याने त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे त्याने सोमवारी तिची गळा घोटून हत्या केली. हत्येनंतर इब्राहिम तुर्कीला पळून गेला.




























































