
शिरुर कासार तालुक्यातील पौंडुळ येथील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत चुलत्याने कोरोना लॉकडाऊनमध्ये एकटी असल्याच्या संधीचा फायदा घेत बलात्कार केला व तेथून हा आरोपी पळून गेला होता.
त्यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरिक्षक सुरेश खाडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र पवार व पोलीस उपनिरिक्षक मनोज बरूरे यांनी या आरोपीला पकडून अटक केले होते. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये त्या आरोपीची कोरोना टेस्ट चाचणी करण्यात आली असता आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आला होता. त्यामुळे त्याला शिरुर येथील शासकीय मुलींचे वस्तीगृह जे कोरोना रूग्णासाठी विलगीकरण कक्ष सेंटर म्हणून बनवले होते. त्या कोरोना विलगीकरण कक्षामध्ये या आरोपीला ठेवण्यात आले होते. तेव्हा आरोपी बाळू भीमा पवार हा कोरोना सेंटरमध्ये लाईट नसल्यामुळे अंधाराचा फायदा घेत तेथून पळून गेला होता. त्यानतंर शिरूर पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या मागावरच होते. तेव्हा दि.9 फेब्रुवारी रोजी शिरूर पोलीस स्टेशनचे निरिक्षक सिद्धार्थ माने यांना हा आरोपी अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील शिवारामध्ये ऊस तोडीत असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती.
आष्टीचे पोलीस उपअधिक्षक विजय लगारे, शिरूर पोलीस निरिक्षक सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक डॉ.रामचंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब आहेर, पोलीस नाईक हनुमंत साळुंके यांनी दि.9 फेब्रुवारी रोजी तातडीने अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे जाऊन ऊसाच्या शेतामध्ये ट्रॅप लावून रात्रभर ऊसाच्या शेतात गस्त घालून दुसNया दिवशी लपून बसलेला आरोपी बाळू भीमा पवार रा.पौंडुळ, तालुका शिरूरकासार, जिल्हा बीड हा शेतामधून बाहेर निघताच त्याच्यावर झपड घालून त्याच्या मुसक्या आवळून त्याला पकडण्यात आले व आरोपीला अटक करून शिरूर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले आहे































































