
मुंबई विद्यापीठाच्या कालिना पँम्पसमध्ये मलेरियाचा फैलाव झाला असून आंबेडकर भवनात मलेरियाच्या अळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू, पुलसचिव यांच्यासोबत सर्व वरिष्ठ अधिकार्यांची कार्यालये आंबेडकर भवनात असून खबरदारी म्हणून विद्यापीठ आणि महापालिका एच विभागाकडून पुलसचिवासह 28 जणांच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
आंबेडकर भवनामागील भागात वाढलेली अस्वच्छता आणि त्याकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे या परिसरात मोठया प्रमाणात मलेरियाच्या अळ्या आढळून आल्यात. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मलेरियाचा फैलाव झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या एच विभागाकडून नुकतीच तपासणी करण्यात आली होती. त्यात सापडलेल्या अळ्या या मलेरियाच्या होत्या अशी पुष्टी मिळाली. त्यामुळे तातडीने पुलसचिवांसह आंबेडकर भवन येथे कायम उपस्थित राहणाया 28 अधिकारी कर्मचायांच्या रक्त चाचण्या आज सकाळी करण्यात आल्या.
दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल
महापालिकेकडून मलेरिया संसर्गाची नियमित तपासणी करण्यात येते. मलेरियाच्या आळ्या सापडल्याचा अहवाल एच विभागाला पेस्ट पंट्रोल विभागाकडून मिळाला. हा अहवाल मिळाल्यानंतर आज तातडीने आंबेडकर भवन येथील 28 जणांच्या रक्त चाचण्या करण्यात आल्या असून येत्या दोन दिवसांत त्यांचा अहवाल आल्यावर चित्र स्पष्ट होईल, असे महापालिका एच विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.



























































